ब्रेकिंगसंपादकीय

बँक ऑफ महाराष्ट्र येळंब (घाट) शाखेसमोर आक्रोश ठिय्या आंदोलन.. मागण्या मान्य करत वरिष्ठांकडून तात्काळ बैठक..!

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

आंदोलन यशस्वी
आज येळंब घाट येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर आक्रोश ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी नवीन कुमार यांच्या समोर शेकडो शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. यानंतर अधिकाऱ्यांनी जागेवरच ११ मागण्यांपैकी ८ मागण्या मान्य केल्या तर उर्वरित मागण्यांसाठी ६ महिन्याचा वेळ मागितला असुन शाखेतील कामकाज सुरळीत सुरू करण्यात आले आहे. तर सर्वच शेतकऱ्यांना सन्मानाने वागणुक मिळेल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यानंतर निवेदन देऊन पुढील एक महिन्यात सर्व प्रश्न मार्गी न लागल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देत आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, बी.एस कदम सर, डॉ.अमर कदम, विकास आबा कदम, दिनेश कदम, सेवानंद कदम, सतीश कदम, जम्मील शेख, प्रमोद कांबळे, नितीन ढाणे, मिस्किन फौजी, राजेंद्र वाघ, प्रदिप कदम, पांडु तात्या कदम, गणेश कदम यांच्या सह छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाचे सदस्य, शेकडो शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे