ब्रेकिंगसंपादकीय

वक्फ जमिनीचा डाटा बेस तयार होतोय; ? हिंदु देवस्थानाबद्दल भेदभाव का?? :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्य.संपादक /प्रदिप वाघमारे

वक्फ जमिनीचा डाटा बेस तयार होतोय; ? हिंदु देवस्थानाबद्दल भेदभाव का?? :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्य.संपादक.प्रदिप वाघमारे

___

बीड जिल्ह्य़ातील विविध धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिनी भुमाफियांनी स्थानिक राजकारणी,महसुल प्रशासनातील आधिका-यांशी संगनमतानेच बोगस दस्तावेज तयार करून बळकावल्या त्या संदर्भात वक्फ बोर्डाकडून काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले परंतु हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात संबधितांवर गुन्हे दाखल करण्यास जिल्हाधिकारी कार्यालय,महसुल प्रशासन व पोलीस प्रशासनातील आधिकारी जाणीवपूर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली असून संबधित प्रकरणात पराग सोमन उप आयुक्त (महसुल)विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी बीड,पोलीस अधीक्षक बीड यांना अर्जात नमुद मुद्यांबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांचे उपजिल्हाधिकारी (सामान्य)भु-सुधार विभाग जि.का.बीड यांना आदेश
___
जिल्हाधिकारी बीड यांनी डाॅ.गणेश ढवळे यांच्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकारी (सामान्य)भु-सुधार विभाग जि.का.बीड यांना बीड जिल्ह्य़ातील हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणातील संबधितांवर गुन्हे दाखल करण्यास विभागीय आयुक्त कार्यालय,महसुल प्रशासन,धर्मादाय आयुक्त व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबधितांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या तक्रारीच्या अनुषंगानेच नमुद मुद्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून शासन नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत आदेश दिलेले आहेत.

वक्फ बोर्ड इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल हिंदु देवस्थान इनाम जमिन प्रकरणात दिरंगाई का?? :-डाॅ.गणेश ढवळे
____

बीड जिल्ह्य़ातील दर्गाह मशिद ईनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु हिंदु देवस्थान इनाम जमिन बीड तालुक्यातील नामलगाव येथिल आशापुरक देवस्थान,पालवण येथिल श्रीरामचंद्र देवस्थान,नेकनुर येथील गोसावी मठ,खापरपांगरी येथिल श्रीरामचंद्र देवस्थान,बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रातील कालिंदेश्वर मंदिर, तसेच आष्टी तालुक्यातील खडकत येथील विठोबा देवस्थान,पांढरी येथील रामचंद्र देवस्थान,खर्डा येथिल विठोबा देवस्थान,चिंचपुर येथील श्रीरामचंद्र देवस्थान तसेच अंबाजोगाई तालुक्यातील शहरातील थोरले दत्तात्रेय देवस्थान तसेच धारूर तालुक्यातील बालाजी देवस्थान आदि ठिकाणी बोगस दस्तावेज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण केल्याबद्दल संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी वारंवार निवेदने आंदोलनानंतर सुद्धा गुन्हा दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे