ब्रेकिंगराजकिय

मान्सूनपूर्व नालेसफाई कागदोपत्रीच ,शहराला तलावाचे स्वरूप ; होड्यांसाठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून द्या :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्य.संपादक/प्रदिप वाघमारे

मान्सूनपूर्व नालेसफाई कागदोपत्रीच ,शहराला तलावाचे स्वरूप ; होड्यांसाठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून द्या :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड तालुका प्रतिनिधी.माया अनुरथ वाघमारे

___
बीड नगरपालिकेमार्फत मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन लाखो रूपयांचा अपहार केला असून शहरातील मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये,बाजारपेठा, शाळा परीसरांना तलावाचे स्वरूप आले असून दुचाकी,पादचा-यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून बीडकरांना होडी,नाव साठी माफक दरात कर्ज उपलब्ध करून बीड नगरपरिषदेला ग्रामपंचायत दर्जा देण्यात यावा आदि.मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी होडी/नाव चालवा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शेख युनुस,सुदाम तांदळे,रामनाथ खोड,एस.एम.युसुफ, मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन,नितिन सोनावणे यांच्यावतीने देण्यात आले आहे.

मान्सूनपूर्व नाल्यासफाई कागदोपत्रीच; घनकच-यासाठी महिन्याकाठी २७ लाख पाण्यात
____
शहरातील बहुतांश भागात नाल्याची कामेच नाहीत; असलेल्या नाल्याची नियमित साफसफाई नाही मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठी आलेल्या लाखो रूपयांच्या निधीचा कागदोपत्रीच स्वच्छतेची कामे दाखवुन राजकीय पुढारी नगरपरिषद आधिका-यांशी संगनमतानेच शासनाकडून प्राप्त विशेष निधीचा अपहार केला जातो. बीड नगरपालिकेमार्फत घनकचरा व्यवस्थापनासाठी “कनक एन्ट्रप्रायजेस “कंत्राटदाराला २७ लाख रूपये देण्यात येतात मात्र कागदावरच कामे दिसुन येत असून प्रत्यक्षात कामे होतच नाहीत आधिकारी,पदाधिकारी लाभार्थी असल्याने मुग गिळुन गप्पच असतात.

विकासाचे पर्व…बीड पाण्याखाली सर्व ;दुषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका
___
दरवर्षीच सत्ताधाऱ्यांकडून बीड शहरातील साफसफाईचे सोशल मिडीयावर तसेच दैनिकात प्रसिद्ध बातम्याद्वारे विकासाच्या पर्वाचे दावे केले जातात मात्र हे पोकळ दावे पावसाने फोल ठरवले जातात त्यामुळेच केवळ पोकळ दावे करण्यापेक्षा शहरातील नाल्याची साफसफाई करून बीडकरांना अडचणीतुन सोडवणे महत्वाचे आहे .
पावसाने नाल्या तुडुंब भरून रस्त्यावरून वाहु लागल्यामुळे सर्वत्र दुषित पाणी झाले असून रोगराई पसरून आरोग्यास मोठ्याप्रमाणात नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे