ब्रेकिंग

अबब ! येळंब घाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १३ पदे रिक्त ; डॉ.गणेश ढवळे, आणी अशोक काळकुटेंची पदे भरण्याची मागणी.

मुख्य.संपादक/प्रदिप वाघमारे

अबब ! येळंब घाट प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल १३ पदे रिक्त ; डॉ.गणेश ढवळे, आणी अशोक काळकुटेंची पदे भरण्याची मागणी.

बीड | प्रतिनिधी. माया अनुरथ वाघमारे

बीड तालुक्यातील येळंब घाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन वर्षांपासून तब्बल १३ पदे रिक्त आहेत. यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा डॉ.तांदळे यांच्या कडे गेल्या काही वर्षांपासून पदभार आहे परंतु त्यांनी कधीही रुग्णांना सेवा दिली नाही किंवा आरोग्य केंद्रात उपस्थित राहिलेले नाहीत. तर सध्या वैद्यकीय अधिकारी-१, लॅब टेक्निशियन -१ , हेल्थ असिस्टंट १, ए.एन.एम-३, एम.पी.डब्लु -३, परिचारिका-४ अशा जागा रिक्त आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून पी.एम.साठी ट्रेनिंग झालेला परिचर नसल्याने मोठी अडचण निर्माण झालेली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत एकुण ३१ गावं आणि ४३००० लोकसंख्या आहे. याचा विचार केला तर अतिशय गंभीर परिस्थिती असुन सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे तरीसुद्धा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
या सर्व रिक्त जागांवर तात्काळ नियुक्तया देण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन डॉ.गणेश ढवळे आणि राष्ट्रीय छावा संघटनेचे युवा अध्यक्ष अशोक काळकुटे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गित्ते यांना दिले आहे.
येत्या १५ दिवसात यावर कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे आणि राष्ट्रीय छावा संघटनेचे युवा अध्यक्ष अशोक काळकुटे यांनी दिला आहे.


बीड जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, स्त्री व कुटीर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी दिली आहे.
जर एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतील तर जिल्हाभरात किती आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असेल याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे या शासकीय रूग्णालयात केवळ सर्व सामान्य नागरिक उपचार घेत असतात परंतु यंत्रणा जर एवढी कमकुवत असेल तर लोकांना उपचार कसे मिळणार हा खरा प्रश्न आहे.
तर वैद्यकीय अधिकारी डॉ.तांदळे यांना लवकरात लवकर चार्ज देऊ असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गित्ते यांनी दिले आहे. तर वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला डॉ.ढवळे आणि अशोक काळकुटे यांना दिला आहे.


सध्या केवळ ५ लोकांवरच कारभार.

  1. सध्या येळंब घाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपूर्ण कारभार हा वैद्यकीय अधिकारी-१, आरोग्य सहाय्यक-२, आरोग्य सेविका-१, आरोग्य सेवक-१ यांच्यावर अवलंबून असल्याने आणखी अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे