ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ..!

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ..!

बीड जिल्हा (प्रतिनिधी):- माया अनुरथ वाघमारे

मुंबई दि,30 -शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांच्या शिकवणीचा विजय आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल, अशी ग्वाहीदेखील शिंदे यांनी दिली.

“हा बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दीघे यांच्या शिवकणीचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल. सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणार आहेत. राज्याच्या विकासाचा गाडा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याआधी मी या सरकारचा भाग नसेन. मात्र हे सरकार सुरळीत चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असेन, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विनंती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे