आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

लिंबागणेश ग्रामपंचायतमार्फत “राष्ट्रीय डाॅक्टर्स दिन “साजरा :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

लिंबागणेश ग्रामपंचायतमार्फत “राष्ट्रीय डाॅक्टर्स दिन “साजरा :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड/प्रतिनिधी

____
बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ग्रामपंचायत मार्फत आज दि.१ जुलै रोजी “राष्ट्रीय डाॅक्टर्स दिन “निमित्ताने सरपंच निकिताताई गलधर,युवा नेते स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनात लिंबागणेश पंचक्रोशीतील आरोग्य सेवा देणा-या डाॅक्टरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी डाॅ.रूपाली राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून नेकनुर पोलीस स्टेशन सपोनि शेख मुस्तफा उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांच्यावतीने डाॅ.रूपाली राऊत, डाॅ.भारत नांदे,डाॅ.प्रसन्ना कुलकर्णी डाॅ.अभिजित गिरे,डाॅ.प्रतिभा मेंगडे,डाॅ.पल्लवी वाणी यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात आरोग्य सेवा देणारे परिचारीका शिंदे तसेच औषधी दुकानदार,लॅब टेक्निशियन यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डाॅ.गणेश ढवळे यांनी तर माजी सरपंच बाळासाहेब मुळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश ढवळे,समीर शेख,विलास जाधव, जीवन मुळे,तुकाराम गायकवाड पप्पुआवसरे,बाळासाहेब गायकवाड,गणेश लिंबेकर औदुंबर नाईकवाडे,तुकाराम गायकवाड,महादेव बारगजे,यतीन जोशी,अक्षय ढवळे,आहेरकर, एएसआय निकाळजे,पो.ह.राऊत,पो.अं.ढाकणे,पो. ना.डीडुळ आदि उपस्थित होते.

 

कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा दिली :-डाॅ.रूपाली राऊत
____
शासकीय आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय आधिकारी,कर्मचारी यांनी एकजुटीने कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिली ,ग्रामपंचायतने सर्वतोपरी सहकार्य केल्यामुळे मोठ्या महामारीच्या संकटाशी सामना करत आपण यशस्वी झालो,ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील काही तुरळक घटना सोडल्या तर आपण कोरोनाशी यशस्वी झुंज दिली म्हणावी लागेल.

डाॅक्टर – रूग्णांमधील सुसंवाद आवश्यक :- शेख मुस्तफा सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन
____
सध्याच्या कालावधीत डाटक्टरावरील हल्ले आणि आरोपांच्या संख्येत वाढ झाली असून रूग्णसेवा देणारे दहशतीच्या वातावरणात वावरताना दिसतात, फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच मोडीत निघण्याची चिन्हे असून डाॅक्टरांनाही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत असताना काही समाजकंटकाकडुन जाणीवपुर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतुने घटना घडल्याचे आढळते एकंदरीतच रूग्ण आणि डाॅक्टर्स यामधील सुसंवाद घडणे महत्वाचे असून डाॅक्टरांनी दिलेल्या आरोग्य सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डाॅक्टर्स डे आपण साजरा करतो जे अत्यंत आवश्यक आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे