ब्रेकिंगसंपादकीय

स्मशानभुमी अभावी मृत्युनंतर हेळसांड; उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्य संपादक/प्रदिप वाघमारे

स्मशानभुमी अभावी मृत्युनंतर हेळसांड; उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ;जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड /प्रतिनिधी.

___
बीड जिल्ह्य़ातील १३९४ पैकी ६३८ गावांमध्ये स्मशानभुमीची सुविधा असली तरी त्याची दुरावस्था असुन ६५६ गावांमध्ये स्मशानभुमीची सोयच नाही. काही ठिकाणी स्मशानभुमीची सोय असली तरी दुरावस्थेत असून शेडच नाही अथवा मोडकळीस दुरावस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असून काही ठिकाणी रस्ताच नाही तर काही ठिकाणी शेतालगत अंत्यसंस्कार करताना वाद होत आहेत त्यामुळेच जिल्हाप्रशासनाने तात्काळ जिल्हा वार्षिक नियोजन मधुन तसेच २५:१५ मधुन निधीची तरतूद उपलब्ध करून देत स्मशानभुमी बांधण्यात याव्यात या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,सुदाम तांदळे,बलभीम उबाळे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन यांनी दि.४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाप्रशासनाला दिले आहे.

जिल्हापरीषदेअंतर्गत ३८२ पैकी केवळ १३५ कामेच प्रगतीपथावर अन्य रखडलेलीच
___
बीड जिल्ह्य़ातील २०२१ -२२ मध्ये जिल्हापरीषद अंतर्गत ३८२ गावांमध्ये स्मशानभुमीसाठी मंजुरी मिळाली यापैकी १३५ ठिकाणी कामे झाली आहेत तर ईतर ठिकाणची कामे रखडलेलीच आहेत साधरणतः १५० ठिकाणी पत्र्याचे शेड नसल्याने तर ८० ठीकाणी रस्ता नसल्याने तर काही ठिकाणी विजेची सोय नसल्यामुळेच विविध अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.

दलित महिलेचा अंत्यविधी रोखण्याच्या ३ महिन्यात ३ घटना
____
सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या कार्यकाळात केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी)गावत दलित महिलेचा अंत्यविधी रोखण्याच्या ३ महिन्यात ३ घटना घडल्या होत्या. त्यामुळेच शेतालगत अंत्यसंस्कार केल्यानंतर काही शेतक-यांचा विरोध असतो त्यातुनच तणाव,तंटे निर्माण होतात. व गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्यास कारणीभूत स्मशानभुमीचा अभाव हे एक प्रमुख कारण ठरताना दिसुन येत आहे त्यामुळेच तात्काळ निधी उपलब्ध करून स्मशानभुमी बांधण्यात याव्यात.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे