ब्रेकिंगमहाराष्ट्र

सौताडा येथील शिंदेवस्ति भारताच्या नकाशावर..!

मुख्य संपादक |प्रदिप वाघमारे

सौताडा येथील शिंदेवस्ति भारताच्या नकाशावर;शहरी नद्यांची पुनर्कल्पना राष्ट्रीय विद्यार्थी शोधनिबंध स्पर्धेत पुण्याच्या मोहीनी भोसेकरांना तृतीय पारितोषिक :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड |प्रतिनिधी 
____
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अर्बन अफेयर्स (NIUA)आणि नॅशनल मिशन फाॅर क्लीन गंगा-नमामि गंगे (NMCG)द्वारे ‘शहरी नद्यांची पुनर्कल्पना ‘ या विषयावर राष्ट्रीय विद्यार्थी प्रबंध स्पर्धा STC सीझन-२ प्रायोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा उद्देश देशातील तरूणांचे बुद्धी कौशल्य आणि प्रतिभा, आपल्या देशातील शहरी नद्यांचे व्यवस्थापन आणि पुनर्कल्पना करण्यासाठी उद्युक्त करणे असुन बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील सौताडा गावातील शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांच्या समस्या तसेच रामेश्वर मंदिर, सौताड्याचा प्रसिद्ध धबधबा यांचा अभ्यास करून पुणे येथील मोहिनी विकास भोसेकर या विद्यार्थीनीला बॅचलर आणि मास्टर्स श्रेणीतील भारतातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मुख्य सचिव उत्तरप्रदेश सरकार श्री.दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते वाराणसी येथे प्रदान करण्यात आले एकंदरीतच सौताडा येथील शिंदेवस्तिचे नाव त्यानिमित्ताने भारताच्या नकाशावर पोहचले.

सविस्तर माहीतीस्तव
____
बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील मौजे. सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत विंचर्णा नदीवरील साठवण तलाव बांधल्यावर गावाचा मुख्यभागापासुन शिंदेवस्ति नावाचं बेट राहिलं ज्याठिकाणच्या ग्रामस्थांना फक्त तराफ्याद्वारे जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो येथील ग्रामस्थांना पुल आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.येथील रामेश्वर मंदिर तसेच प्रसिद्ध धबधबा यांना प्रत्यक्ष भेट देऊन वास्तुविद्या प्रकल्पाचा प्रस्ताव हा गावासाठी समग्र पुनरूज्जीवन योजना होती यात शिंदेवस्तिवरील कृषिपर्यटन,रामेश्वर मंदिर,धबधब्यासाठी पर्यटन केंद्र,निवास व्यवस्था,अभ्यागतांसाठी कार्यशाळा,वनौषधी,फळे,भाजीपाला शेती यासारख्या प्रजातीसह ‘रिपेरियन बफर झोन आदि विविध सरकारी योजनांसाठीच्या CSR निधीच्या मदतीने प्रकल्प स्वप्नातुन वास्तवात बदलला जाऊ शकतो भारतातील विविध नद्या आणि उपनद्यांमधील शेकडो गावांसाठी हा प्रकल्प आदर्श ठरवु शकतो याविषयी प्रबंध सादर केला होता.

सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे,पत्रकार पार्थ एमएन,सरपंच सानप आणि मार्गदर्शक डाॅ.प्रा.कविता मुरूगकर यांची मदत लाख मोलाची:- मोहिनी भोसेकर
____
PARI नेटवर्कची बीड जिल्ह्य़ातील सौताडा गावातील शिंदेवस्तिवरील बातमी वाचल्यानंतर पत्रकार पार्थ एमएन आणि बीड जिल्ह्य़ातील सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी संपर्क साधला. मार्गदर्शक डाॅ.प्रा.कविता मुरूगकर यांच्या समवेत सौताडा गावातील शिंदेवस्तिवरील ग्रामस्थ,रामेश्वर धबधबा आणि मंदिराला भेट देत “सहभागी दृष्टीकोन ‘पद्धतीचा अवलंब करत तराफ्यावरून प्रवास करत ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या मुलाखती द्वारे जाणुन घेतल्या सरपंच सानप यांच्या आकांक्षा आणि नदीच्या गरजा समजून घेत प्रकल्पासाठीच्या प्रमुख समस्या आणि विशेष बाबी शोधुन काढल्या पर्यटनाच्या पायाभुत सुविधांचा अभाव यामुळे तेथील सामाजिक-आर्थिक परिस्थिती खालावत गेल्यामुळे गावातील तरूणांचे स्थलांतर होत आहे योग्य प्रकारे संवर्धन झाल्यास ग्रामस्थांचा आर्थिक विकास व भरभराट होऊ शकते. या संपूर्ण कामामध्ये संपूर्ण दिवसभर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांनी सोबत राहून गावातील समस्या त्याविषयी प्रशासनाशी दिलेला लढा,आंदोलने याची सविस्तर माहिती दिली.

प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्यामुळे सौताडा (शिंदेवस्ति)भारताच्या नकाशावर:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
गेल्या २ वर्षापासून सौताडा गावातील शिंदेवस्तिवरील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न शासन दरबारी मांडत असुन निवेदने, बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको,उपविभागीय कार्यालय पाटोदा येथे धरणे,औरंगाबाद येथे आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच १५ ऑगस्ट २०२१ रोजी रामेश्वर साठवण तलावात ‘जलसमाधी आंदोलन “करण्यात आले होते प्रसिद्धी माध्यमांनी याला मोठ्याप्रमाणात प्रसिद्धी दिल्याने पुणे मुंबई येथील मिडीयावाले या ठिकाणी येऊन बातम्या करत होते त्यामुळेच मुंबईच्या बांद्रेकरवाडी मंडळाकडुन तराफ्याची भेट देण्यात आली होती एकंदरीतच भारताच्या नकाशावर शिंदेवस्ती येण्यात श्रेय बीड जिल्ह्य़ातील प्रसारमाध्यामांचा सिंहाचा वाटा असुन पुण्याच्या मोहिनी भोसेकर यांनी मोठी मेहनत घेऊन सादर केलेला प्रबंध आणि त्यांना मिळालेले पारितोषिक याबद्दल बीडकरांच्यावतीने अभिनंदन.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे