ब्रेकिंग

पोल्टी फार्म मुळे नेकनूर येथील नन्नवरे वस्ती वरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!

मुख्य संपादक प्रदिप वाघमारे

पोल्टी फार्म मुळे नेकनूर येथील नन्नवरे वस्ती वरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात..!

बीड/प्रतिनिधी.

दि. १० बीड तालुक्यातील नेकनूर येथील सर्वे नंबर२६२(इ/ई)मधील अनधिकृत पोल्ट्री फार्म मुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे सदरील पोल्ट्री फॉर्म तातडीने बंद करावा अशी मागणी नेकनूर येथील नन्नवरे वस्ती वरील ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या कडे निवेदनाद्वारे शनिवारी दि.०९ रोजी केली आहे निवेदनात पुढे म्हटले आहे एक नेकनूर शिवारातील नन्नवरे वस्ती येथील सर्वे नंबर२६२ (३/इ मध्ये सत्तार नेहरूनिया मन्यार सुकूर सत्यार मन्यार रौफ सत्तार मन्यार सर्व.रा.नेकनूर यांनी ग्रामपंचायत अथवा शासनाची कसलीही परवानगी नसताना पोल्ट्री फॉर्म सुरु केलेला आहे या फार्मच्या वासामुळे लोकवस्ती वरील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच लहान मुलांना साथीच्या रोगाची लागन होत आहे सदरील पोल्ट्री फॉर्म अनाधिकृत आहे तसेच सय्यद मनुद्दीन खाजा यांनी देखील नवीन पोल्ट्री फॉर्म च्या कामाला सुरवात केली आहे तरी पोलिसांनी तातडीने चौकशी करून अनाधिकृत पोल्ट्री फॉर्म बंद करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा कायदेशीर आंदोलन करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे