ब्रेकिंगराजकिय

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!

मुख्य संपादक /प्रदीप वाघमारे

द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!

नवी दिल्ली :

राष्ट्रपती पदासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी पार पडली यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत

द्रौपदी मुर्मू या या मतमोजणीत आघडीवर होत्या, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपकडून त्यांच्या विजयाचा जल्लेष साजरा करण्यात येत होता. आमदारांच्या मतदानानंतर दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर ३२१९ मते मोजण्यात आली होती, ज्या मतांचे मुल्यम ८ लाख ३८,८३९ त्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ५ लाख ७७ हजार ७७७ मुल्यांची २१६१ मते खासदार आणि आमदारांची मते मुर्मू यांना मिळाली आहेत.

तर युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना १०५८ इतकी मते आमदार आणि खासदारांनी दिली आहेत ज्यांचं मुल्य २ लाख ६१ हजार ६२ होतं. तीसरी आणि शेवटच्या फेरीतील मते मोजण्यात आल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल. एकूण मतांचे मुल्य दहा लाखापेक्षा जास्त आहे, त्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार या निवडणूकीत विजयी होतो. महत्वाचे म्हणजे मुर्मू यांना तेवढी मते मिळाली आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे