ब्रेकिंग

बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणात एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्य संपादक | प्रदिप वाघमारे

बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणात एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असुन तपास यंत्रणेबाबत जनसामान्यात संशय असून बीड जिल्ह्य़ातील सर्वच प्रकरणात एसआयटी मार्फत अथवा सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येऊन दोषींवर (मोक्का)संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ जुलै २०२२ बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” निदान बेटी बचाओ ” आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात बीड जिल्हाध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ,बीड जिल्हा कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ बालाजी जगतकर,बीड जिल्हा सचिव बाल हक्क संरक्षण संघ आबेद सय्यद,बीड जिल्हा संघटक बाल हक्क संरक्षण संघ शेख मुबीन , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अड.संगिता धसे,अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था किस्किंदाताई पांचाळ,बीड जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी माजी सैनिक अशोक येडे आदि सहभागी असुन निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.

सविस्तर माहीतीस्तव:-
_____
बीड जिल्ह्य़ातील मुलींचा जन्मदर कमी झालेला असून बीड जिल्ह्य़ात गर्भलिंग निदान व गर्भपात संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असुन वरिष्ठ पदावरील राजकीय नेते तसेच शासकीय आधिकारी यांच्या संगनमताने आरोपींवर थातूरमातूर कारवाई करण्यात येऊन मुख्य सुत्रधार यांच्यापर्यंत तपास यंत्रणा जाणीवपुर्वक पोहचत नसुन संबधित प्रकरणात स्थानिक स्तरावर चौकशी न होता पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली (S I.T.) मार्फत अथवा सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी दोषींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी .
महसुल,पोलीस,आरोग्य व अन्न औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या पथकाची स्थापना करून औषधी दुकाने,सोनोग्राफी केंद्र,गर्भपात केंद्र तसेच स्त्रीरूग्णालये याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

बीड जिल्ह्य़ातील तपासयंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह म्हणूनच एसआयटी अथवा सीआयडीमार्फत चौकशी करून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करा
_____
तपास यंत्रणेबाबत जनसामान्यात संशय असून ६ जुन २०२२ रोजी मौजे. बकरवाडी ता.जि.बीड येथील मयत शितल गणेश गाडे प्रकरणात एजंट,वैद्यकीय विद्यार्थी,सोनोग्राफी मशिन असलेला डाॅक्टर जिल्ह्य़ात बरेचदा आल्याचे तसेच एजंट महिलेची लाखोंची संपत्ती तसेच तिच्या घरात गर्भपाताची उपकरणे व औषधी तसेच सोनोग्राफीसाठी लागणारी जेली आढळणे म्हणजेच शितलसह अनेक महिलांचे गर्भलिंग निदान झाल्याचे स्पष्ट होऊन सुद्धा कोणाकोणाचे गर्भलिंग निदान झाले? किती जणांचे गर्भपात झाले?? गर्भपात कोणी केले?? याविषयी तपासयंत्रणा जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असुन आरोपींची पाठराखण करण्यात येत असून संबधित प्रकरणात जबाबदार तपासयंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व तपास एसआयटी अथवा सीआयडीमार्फत करण्यात येऊन( मोक्का )संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.

महिला लोकप्रतिनिधींचे मौन का??
____
बीड जिल्ह्य़ातील सर्वच पक्षातील महिला लोकप्रतिनिधींकडून या गंभीर आणि संवेदनशील विषयावर मुग गिळुन गप्प बसण्याची भुमिका त्यांचे मौन जनसामान्यात क्षोभ निर्माण करणारे असुन महिला लोकप्रतिनिधींचे मौन अत्यंत क्लेशदायक आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे