ब्रेकिंग

ओबीसी राजकीय आरक्षणाचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख शिलेदारांमधील एक व्यक्तिमत्व मा. नानासाहेब राऊत यांचा सेलू ओबीसींच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला*

मुख्य संपादक |प्रदिप वाघमारे

*ओबीसी राजकीय आरक्षणाचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख शिलेदारांमधील एक व्यक्तिमत्व मा. नानासाहेब राऊत यांचा सेलू ओबीसींच्या वतीने सत्कार करून सन्मान करण्यात आला*

प्रतिनिधी:रोहित झोल सेलू जिल्हा परभणी

*सेलू*बातमी: परभणी जिल्ह्यातील ओबीसी संघर्ष समितीची अतिशय चांगली धुरा सांभाळणारे व ओबीसींच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील असणारे तथा परभणी येथील ओबीसी राजकीय आरक्षणाचा यशस्वी लढा उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे मा. नानासाहेब राऊत यांचा सेलू येथे ओबीसी पर्व ग्रुपच्या वतीने यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी नानासाहेबांनी घेतलेल्या परभणी जिल्हा ओबीसी मोर्चा मधील मेहनतीचा व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ओबीसी पर्व ग्रुप चे सदस्य तथा न्हावी समाजाचे तालुकाध्यक्ष रमेशजी गोरे यांच्या हस्ते नानासाहेब राऊत यांचा पुष्पहार अर्पण करून व पेढे भरून सन्मान करण्यात आला.
ओबीसी समाजाच्या भविष्यातील अडीअडचणीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील असून येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामना करून समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. ओबीसींच्या मागण्या व हक्कासाठी आपण नेहमी संघर्ष करत राहू व सर्वांनी अशीच आम्हाला साथ द्यावी. समाजाच्या विविध मागण्या शासनाकडून मान्य होण्यासाठी मी प्रयत्नशील असेल, आपण सर्वांनी मिळून समाजाच्या विविध मागण्या व त्यासाठी यशस्वी लढा देऊन ओबीसी राजकीय आरक्षण मिळवले परंतु पुढील भविष्यातील आव्हाने पाहता ओबीसी समाजातील जातनिहाय स्वतंत्र जनगणना हा अतिशय महत्त्वकांक्षी व ज्वलंत विषय असून त्यावर भविष्यात रस्त्यावरची लढाई लढणे महत्त्वाचे राहील व त्यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन नानासाहेब राऊत यांनी केले.
यावेळी ओबीसी पर्व ग्रुप सेलूचे ॲडमिन महादेव गायके, सह ॲडमिन ॲड. प्रभाकर गिराम, विठ्ठल भाऊ कोकर पंकज भैया चव्हाण, रमेश गोरे, माऊली उबाळे आदीसह असंख्य ओबीसी पर्व ग्रुप बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे